Ad will apear here
Next
‘भारत फोर्ज’मध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाची सांगता


मुंबई : भारत फोर्जमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाची सांगता झाली. भारत फोर्जचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबा एन. कल्याणी यांनी सर्व सहभागी सदस्यांच्या प्रयत्नांचे व सांघिक कार्याचे कौतुक केले.  

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन, एनजीओ, शाळा, आयटीआय, ग्राम विकास संघ, ग्रामपंचायत सदस्य व कल्याणी ग्रुप कंपन्यांचे कर्मचारी यांना अॅप्रिसिएशन सर्टिफिकेट देण्यात आली. या उपक्रमासाठी सातत्याने पाठिंबा दिल्याबद्दल स्थानिक नगरसेवकांचाही सत्कार करण्यात आला.

‘स्वच्छता ही सेवा’ १५ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर २०१८ या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ या राष्ट्रीय उद्दिष्टाप्रती सुरू केलेले अभियान आहे. स्वच्छ व शाश्वत समुदाय निर्माण करण्याचे उद्दिष्ट असलेली एक जबाबदार कॉर्पोरेट म्हणून भारत फोर्जने राष्ट्रीय अभियानाच्या समर्थनार्थ ही वाटचाल सुरू केली. या अभियानाचा भाग म्हणून भारत फोर्जने जागृतीपर रॅली, दारोदार कॅम्पेन, आसपासच्या भागाची, शाळांची, समुदायांची व गावांची स्वच्छता व सुशोभीकरण या तीन मुख्य क्षेत्रांत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले होते.


‘स्वच्छता ही सेवा’अंतर्गत भारत फोर्ज एक लाख ५४ हजारांहून अधिक व्यक्ती, ३२ गावे, १३७ समुदाय, ३२ हजार ६५० घरे व ४७ शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचली. स्वच्छता राखण्यासाठी आणि शाळा व स्थानिक सामाजिक स्तरावर स्वच्छताविषयक विविध स्पर्धा आयोजित करण्यासाठी समित्यांची स्थापना करून ही मोहीम यापुढेही सुरू ठेवली जाईल.

भारत फोर्जचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबा एन. कल्याणी व महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आलेल्या जागृती रॅलीने १५ सप्टेंबर २०१८ रोजी भारत फोर्जमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाची सुरुवात झाली. त्यानंतर एकूण ४० जागृती रॅलींचे आयोजन केले व स्वच्छ पर्यावरणाचे महत्त्व सांगण्यासाठी व स्वच्छतेविषयी जागृती करण्यासाठी त्यामध्ये १६ हजार ७५० हून अधिक लोकांनी सहभाग घेतला. या रॅली आसपासच्या समुदायांमध्ये, दत्तक घेतलेल्या पालिका व जिल्हा परिषद शाळांमध्ये, आयटीआय, दत्तक घेतलेल्या गावांमध्ये आणि भारत फोर्ज व कल्याणी ग्रुप कंपन्यांच्या आसपास आयोजित करण्यात आल्या.

स्थानिक परिसराची स्वच्छता करण्यात आली आणि विशिष्ट परिसरांमध्ये वॉल पेंटिंग व वृक्षलागवड करून सुशोभीकरण करण्यात आले. स्वच्छता मोहिमेमध्ये अंदाजे चार हजार ६०० लोक सहभागी झाले आणि ‘स्वच्छता ही सेवा’अंतर्गत अंदाजे ८०० झाडे लावण्यात आली. दारोदार अभियान, शाळांमध्ये जागृतीपर सत्रे व पथनाट्ये याद्वारे स्वच्छतेविषयी जागृती करण्यात आली. अंदाजे २०० स्वयंसेवकांनी स्थानिक स्तरावरील शाळा, आयटीआय व घरे यांना भेट दिली आणि स्वच्छता, चांगल्या आरोग्याच्या व स्वच्छतेच्या सवयी, कचरा व्यवस्थापन व कचऱ्याचे विभाजन याविषयी जागृती करण्यात आली. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZTJBT
Similar Posts
‘भारत फोर्ज’चे ‘स्वच्छ भारत’अंतर्गत विविध कार्यक्रम पुणे : अभियांत्रिकी व उत्पादन क्षेत्रात देशात अग्रगण्य असलेल्या ‘भारत फोर्ज’ने ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत १५ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर २०१८ या काळात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या उपक्रमात एक लाख नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचे कार्य ‘भारत फोर्ज’ करणार आहे. या
‘भारत फोर्ज’तर्फे दहा लाखाव्या ‘क्रँकशाफ्ट’चे उत्पादन पुणे : तंत्रज्ञान पुरवठा क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी आणि व्यावसायिक वाहनांसाठी अवजड डिझेल क्रँकशाफ्टचे उत्पादन करणाऱ्या भारत फोर्ज लिमिटेड कंपनीने एक अतिशय महत्त्वाचा टप्पा गाठला असून, डेम्लर एजीच्या अवजड इंजिनाला ताकद देणाऱ्या मशिननिर्मित दहा लाखाव्या क्रँकशाफ्टचे उत्पादन ‘भारत फोर्ज’ने पूर्ण केले आहे
‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा मुंबई : कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेडतर्फे वार्षिक कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, या अंतर्गत ५०० हून जास्त मुलांना एक लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल; तसेच ‘बायजू’चे शैक्षणिक अॅप घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला ऑफर पॅकवर एका महिन्याचे सब्‍सक्रीप्‍शन मोफत मिळेल
‘भाजपने साधला समाजिक समतोल’ मुंबई : ‘सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेसाठी उमेदवारी देताना सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व देण्याचे वचन भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने पाळले असून, एकूण ७८ पैकी नऊ जागांवर मुस्लिम समाजातील उमेदवारांना प्राधान्य देतानाच इतरही सर्व समाज घटकांना उमेदवारी देण्यात आली आहे. सर्वसमावेशक प्रतिनिधीत्व हे भाजपचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language